Trump : ट्रम्प यांचा न्यू गाझा प्लॅन संयु्क्त राष्ट्रांत मंजूर; सैन्यही पाठवणार, मतदानात चीन व रशिया गैरहजर
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या “नवीन गाझा योजने” वर मतदान केले, हा ठराव १३-० मतांनी मंजूर झाला. रशिया आणि चीनने त्यावर व्हेटो करण्याऐवजी तटस्थ राहिले. हा ठराव ट्रम्प यांनी गाझाच्या पुनर्बांधणीची योजना “रिव्हेरा मॉडेल” म्हणून वर्णन केलेल्या २० कलमी शांतता योजनेवर आधारित आहे.