Pakistan Defense Minister : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे ‘एक्स’ अकाउंट भारतात ब्लॉक
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांचे ‘एक्स’ अकाउंट भारतात बंदी घालण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ख्वाजा सतत विष ओकत होते. ते भारताविरुद्धही अनियमित विधाने करत होते. ख्वाजा आसिफ यांनी भारताकडून लष्करी हल्ल्याची भीती असल्याची कबुलीही दिली होती.