Asim Munir : पाकिस्तानमध्ये तिन्ही सेनांचे प्रमुख बनले आसिम मुनीर; PM शाहबाज यांनी शिफारस केली होती
पाकिस्तान सरकारने गुरुवारी आसिम मुनीर यांची देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (CDF) आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) म्हणून नियुक्ती केली. दोन्ही पदांवर त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. या नियुक्तीला राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी मंजुरी दिली.