Rahul Gandhi : पंजाबमध्ये राहुल गांधींचा SPसोबत वाद; पाकिस्तान सीमेजवळ जाण्यापासून रोखले
सोमवारी पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पोलिस अधिकाऱ्यांशी वाद झाला. राहुल गांधी गुरुदासपूरच्या पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी गेले होते. पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या गावांकडे जाताच एसपी जुगराज सिंह यांनी सुरक्षेचे कारण देत त्यांना थांबवले. एसपींनी राहुल गांधींना सांगितले की पुढे पाकिस्तानची सीमा आहे आणि कुंपण तुटलेले आहे.