Pakistan air strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; 11 मुलांसह 13 जणांचा मृत्यू, तालिबान संतप्त
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील सीमावर्ती भागांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 11 लहान मुलांचा समावेश असल्याचा दावा तालिबान सरकारने केला आहे. याशिवाय 14 जण जखमी झाले असून त्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.