Pak PM : ट्रम्प यांच्या गाझा पीस बोर्डवरून पाक PM अडचणीत; विरोधक म्हणाले- ट्रम्पना खूश करण्यासाठी यात सामील झाले, हा श्रीमंतांचा क्लब
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी दावोसमध्ये अमेरिकेच्या ‘बोर्ड ऑफ पीस’च्या सनदेवर स्वाक्षरी केली आहे. हे मंडळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि पुन्हा वसवण्यासाठी तयार करण्यात आले आहे.