PAK Army Chief : PAK लष्करप्रमुखाकडून पुन्हा एकदा द्विराष्ट्र सिद्धांताचा उल्लेख- मुस्लिमांची विचारसरणी हिंदूंपेक्षा वेगळी!
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी शनिवारी पुन्हा एकदा द्विराष्ट्र सिद्धांताचा पुनरुच्चार केला आणि मुस्लिम आणि हिंदू ही दोन वेगवेगळी राष्ट्रे असल्याचे म्हटले. खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील काकुल भागातील पाकिस्तान मिलिटरी अकादमी (पीएमए) येथे कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडला मुनीर संबोधित करत होते.