• Download App
    Pahalgam | The Focus India

    Pahalgam

    Amarnath Yatra : अमरनाथ यात्रा एक आठवडा आधीच बंद; मुसळधार पावसामुळे बालटाल व पहलगाम दोन्ही मार्ग खराब

    अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. ही यात्रा ९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार होती, परंतु मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे ३ ऑगस्ट रोजीच ती थांबवण्यात आली.काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी म्हणाले की, पावसामुळे यात्रा मार्गांचे बरेच नुकसान झाले आहे. बालटाल आणि पहलगाम दोन्ही मार्गांवर दुरुस्तीचे काम केले जाईल, त्यामुळे यात्रा थांबवावी लागली आहे. मार्गांवर सतत मशीन आणि कर्मचारी तैनात असल्याने यात्रा पुन्हा सुरू करणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.

    Read more

    Chidambaram : चिदंबरम यांचा सवाल- पहलगामला अतिरेकी पाकिस्तानातून आले हे कसे माहिती? NIAकडे याचा काय पुरावा? हल्लेखोर देशातीलच असू शकतात

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी सोमवारी म्हटले की, दहशतवादी पाकिस्तानातून आले हे आपल्याला कसे कळले. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील संसदेत चर्चेच्या काही तास आधी काँग्रेसच्या माजी अर्थमंत्र्यांचे हे विधान आले.

    Read more

    Pakistan : पाकिस्तानी उपपंतप्रधानांनी अतिरेकी संघटना TRFचे केले समर्थन; पहलगाम हल्ल्यात सहभागाचे पुरावे देण्याचे आव्हान

    पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी संघटने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) चा बचाव केला आहे संसदेत दिलेल्या निवेदनात डार म्हणाले की, पाकिस्तान टीआरएफला बेकायदेशीर संघटना मानत नाही आणि भारत किंवा अमेरिकेने टीआरएफच्या सहभागाचे ठोस पुरावे सादर करावेत. पहलगाम हल्ल्यात टीआरएफचा सहभाग असल्याचे पुरावे दाखवा. टीआरएफने जबाबदारी घेतल्याचा दावा सिद्ध करा. आम्ही पुराव्याशिवाय आरोप स्वीकारणार नाही.

    Read more

    China : पहलगाम हल्ल्याचा चीनकडून पाकिस्तानचे नाव न घेता निषेध; म्हटले- आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चीनने तीव्र निषेध केला आहे. शुक्रवारी बीजिंगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले की, चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा ठामपणे विरोध करतो आणि २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.

    Read more

    BRICS : QUAD नंतर, BRICS ने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला; मोदी म्हणाले – हा मानवतेवर हल्ला

    रविवारी ब्राझीलमधील रिओ दि जनेरियो येथे झालेल्या १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सदस्य देशांनी ३१ पानांचा आणि १२६ मुद्द्यांचा संयुक्त जाहीरनामा जारी केला. यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला आणि इराणवरील इस्रायली हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

    Read more

    Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेचा पहिला जथ्था रवाना; जम्मूमध्ये LG मनोज सिन्हा यांनी यात्रेला दाखवला हिरवा झेंडा

    अमरनाथ यात्रेसाठीचा पहिला जत्था बुधवारी जम्मूहून रवाना झाला. उपराज्यपाल (एलजी) मनोज सिन्हा यांनी भगवती नगर बेस कॅम्प येथून या जत्थाला हिरवा झेंडा दाखवला. यादरम्यान भाविक ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’चा जयघोष करत राहिले. ही यात्रा ३ जुलैपासून अधिकृतपणे सुरू होईल.

    Read more

    Quad Nations : क्वाड देशांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध; म्हणाले- आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवाद-हिंसाचाराच्या विरोधात

    मंगळवारी क्वाड देशांच्या (भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया) परराष्ट्र मंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आश्वासन दिले.

    Read more

    Pakistan Economic : पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध शक्य; FATF चौथ्यांदा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याच्या तयारीत

    भारतातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय संघटना FATF (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) पाकिस्तानला चौथ्यांदा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची तयारी करत आहे.

    Read more

    Terror Funding Pahalgam : टेरर फंडिंगशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही; FATFने पाकिस्तानला फटकारले, म्हटले- यामागे आर्थिक नेटवर्क

    दहशतवाद्यांच्या निधीवर लक्ष ठेवणारी संघटना फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने सोमवारी म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ला दहशतवाद्यांच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकला नसता. यामध्ये दहशतवाद्यांना निधी देण्यात आला आहे.

    Read more

    Pahalgam : पहलगामपूर्वी आयएसआयने आखली होती आणखी एका हल्ल्याची योजना

    काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने आणखी एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. केंद्रीय यंत्रणांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या दिल्लीस्थित स्लीपर सेल नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. ३ महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या कारवाईनंतर, एजन्सींनी १५ फेब्रुवारी रोजी मध्य दिल्लीतून नेपाळी वंशाचा पाकिस्तानी गुप्तहेर अन्सारुल मियाँ अन्सारी याला अटक केली. त्यानेच हा मोठा खुलासा केला. आता ही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने दिल्लीत स्लीपर सेलचे जाळे पसरले होते.

    Read more

    Pahalgam : पहलगामनंतर सूड उगवण्यास सुरुवात, उरीमध्ये सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार केले

    पहलगामनंतर उरी दहशतवाद्यांचे लक्ष्य होते. पण लष्कराने दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडले. बुधवारी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी ठार मारले. या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल आणि आयईडी जप्त करण्यात आले आहेत.

    Read more

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    अमेरिकेचे उपाध्यक्ष जे‌. डी. व्हान्स भारताच्या दौऱ्यावर आलेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेलेत. या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीर मधल्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे गांभीर्य फार मोठे आहे.

    Read more

    पहलगाममध्ये पारा उणे 3.3 अंशांवर; जम्मू-काश्मीरसह 7 राज्यांत पावसाची शक्यता, देशात थंडी वाढणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : येत्या 24 तासांत जम्मू-काश्मीरसह सात राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये […]

    Read more