Pahalgam terrorist attack : पहलगाम दहशतवादी हल्ला; संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव पुण्यात आणलं
जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. तत्पूर्वी, मुंबईत पार्थिव आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली होती.