Pahalgam attack : पाकची मागणी- पहलगाम हल्ल्याची चौकशी चीन-रशियाने करावी; खरे ते शोधा, NIA ने जम्मूत गुन्हा दाखल केला
पहलगाम हल्ल्याच्या चौकशीत चीन आणि रशियालाही समाविष्ट करावे अशी पाकिस्तानची मागणी आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी रशियन मीडिया रिया नोवोस्तीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान मोदी खरे बोलत आहेत की खोटे बोलत आहेत याची आंतरराष्ट्रीय पथकाने चौकशी करावी.