Pahalgam attack : पहलगाम हल्ला- मेलोनींची मोदींशी चर्चा; दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाठिंबा व्यक्त केला
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी गुरुवारी रात्री पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.