Bawankule, : ‘पाडू’ मशीनवर आक्षेप ही ठाकरे बंधूंची पराभवाची तयारी; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा; मतदानाच्या आदल्या दिवशीच्या भेटीगाठीचेही केले समर्थन
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या पाडू मशीनवरील आरोप फेटाळून लावलेत. ठाकरे बंधूंना आपल्या पराभवाची चाहूल लागली असून, त्यातून ते अशी विधाने करत आहेत, असे ते म्हणालेत. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांच्या भेटीगाठी घेणे हे नियमांनुसारच आहे, असेही ते यावेळी म्हणालेत.