Chidambaram : चिदंबरम यांचा सवाल- पहलगामला अतिरेकी पाकिस्तानातून आले हे कसे माहिती? NIAकडे याचा काय पुरावा? हल्लेखोर देशातीलच असू शकतात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी सोमवारी म्हटले की, दहशतवादी पाकिस्तानातून आले हे आपल्याला कसे कळले. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील संसदेत चर्चेच्या काही तास आधी काँग्रेसच्या माजी अर्थमंत्र्यांचे हे विधान आले.