Asaduddin Owaisi : एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल; MIMच्या असदुद्दीन ओवैसी यांचा विश्वास; अजित पवारांवर साधला निशाणा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एक दिवस हिजाब घालणारी महिलाही भारताची पंतप्रधान होईल, असा ठाम विश्वास एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैंसी यांनी शुक्रवारी येथील एका सभेत बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. अजित पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. राष्ट्रवादीला मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला पाठिंबा, असे ते म्हणाले.