PM Modi : पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- येथील अनेक सहकाऱ्यांचे पूर्वज बिहारचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांना त्यांच्या देशाच्या भेटीदरम्यान देण्यात आला. तो स्वीकारताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी १४० कोटी भारतीयांच्या वतीने हा सन्मान स्वीकारतो.”