Marathwada : नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, धाराशिवला ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मराठवाड्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून नांदेड, लातूर, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.