Thackeray : उद्धव ठाकरेंची जनसुरक्षा विधेयकात बदल करण्याची मागणी, म्हणाले- ते जनतेच्या सुरक्षेसाठी नाही
उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवला आहे. या कायद्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. हे विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे या विधेयकाचे नाव ‘जनसुरक्षा विधेयक’ऐवजी ‘भाजप सुरक्षा विधेयक’ ठेवा असा टोला, उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. जनसुरक्षा विधेयकात काही बदल करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.