Opposition Prepares : मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध विरोधकांची महाभियोगाची तयारी; भाजपचा पलटवार- एसआयआरवरून विरोधकांचे हल्ले
बिहारमध्ये ‘मतचोरी’ आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दल (एसआयआर) मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांनी हल्ला तीव्र केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतदार हक्क यात्रे’च्या दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये रस्त्यावर हा मुद्दा उपस्थित केला. त्याच वेळी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी संसदेत चर्चेची मागणी केली.