Mahadev Jankar : मतचोरीचा मला अनुभव, राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत, विरोधकांचा आरोप योग्यच; महादेव जानकरांची प्रतिक्रिया
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आज बुलढाणा येथे बोलताना ‘देशात मतचोरी होत आहे’ या विरोधकांच्या आरोपाला पाठिंबा दिला. या मुद्द्यावर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यास शेतकऱ्यांनी संपावर जावे, असे आवाहनही त्यांनी केले.