US Airstrikes Syria : अमेरिकेचा सीरियामध्ये ISIS वर हवाई हल्ला; 70 हून अधिक ठिकाणे उद्ध्वस्त; दोन अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूनंतर कारवाई
अमेरिकेने शुक्रवारी सीरियातील दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले. अमेरिकन अधिकाऱ्यांनी CNN ला सांगितले की, ही कारवाई अलीकडे झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आली आहे, ज्यात सीरियामध्ये तैनात अमेरिकेचे दोन सैनिक मारले गेले होते.