Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले- अजित पवारांवर माझा ठाम विश्वास; राजीनाम्याची चर्चा फेटाळली
विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपला अजित पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत आपल्या राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली आहे. या प्रकरणी त्यांनी आपल्या समर्थकांना शक्तीप्रदर्शन करण्याची काहीच गरज नसल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी सिन्नर येथील आपला मेळावा रद्दबातल केला आहे.