Omraje Nimbalkar : खासदार निधीच्या आरोपांवर ओमराजे निंबाळकरांचे उत्तर; मागील टर्मचा एकही पैसा अखर्चित नाही, आधी गणित समजून घ्या!
विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या बंडखोर खासदारांच्या खात्यात ‘खासदार निधी’चे (MPLADS) कोट्यवधी रुपये पडून असल्याचे आकडेवारीसह समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली.