Oman : ओमानमध्ये राहणाऱ्या सात लाख भारतीयांचं टेन्शन वाढणार?
ओमानमध्ये एक नियम लागू होणार आहे ज्याचा परिणाम तिथे राहणाऱ्या भारतीयांवर होईल. खरंतर, ओमान हा आखाती देशांमध्ये वैयक्तिक उत्पन्न कर लागू करणारा पहिला देश असणार आहे. ओमानमध्ये सुमारे ७ लाख भारतीय राहतात. हा नियम काय आहे आणि त्याचा कसा आणि किती भारतीयांवर परिणाम होईल ते आपण समजून घेऊया.