Om Birla : ‘संसद हायटेक होणार’ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी दिली माहिती
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘एक राष्ट्र-एक विधान मंच’ ही संकल्पना मांडली आणि २०२५ पर्यंत सर्व राज्य सभागृहे एकाच व्यवस्थेखाली आणण्याबद्दल ते बोलले.
पटना येथे पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करताना, बिर्ला यांनी विश्वास व्यक्त केला की २०२५ मध्ये देशातील नागरिकांना अशा व्यासपीठावर प्रवेश मिळेल जिथे ते केवळ कीवर्ड, मेटा डेटा आणि सुधारित एआयद्वारे कोणत्याही विषयावरील संसदेच्या अहवालाचा केवळ शोध घेऊ शकणार नाहीत. तर संसदेच्या अहवालाचे निकाल , चर्चा अन् कायदेमंडळांमधील वादविवादही बघू शकतील.