US Oil Purchase : भारताचे अमेरिकेला उत्तर- आंतरराष्ट्रीय नियमांनुसार तेल खरेदी केले; 200 डॉलर प्रति बॅरल तेलाच्या किमतीपासून जगाला वाचवले
भारताने तेल खरेदी करून रशिया-युक्रेन युद्धाला निधी दिल्याच्या आरोपांना उत्तर दिले आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून तेल खरेदी केले आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती स्थिर राहिल्या.