Balochistan : बलुचिस्तानी नेत्याचे ट्रम्प यांना सडेतोड उत्तर- ‘मुनीर यांनी तुमची दिशाभूल केली… तेलाचे साठे पाकिस्तानचे नव्हे तर बलुचिस्तानचे
पाकिस्तानमधील नैसर्गिक संसाधनांबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्यांवर बलुचिस्तानचे नेते मीर यार बलुचिस्तानी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, या प्रदेशात असलेले प्रचंड तेल आणि खनिज साठे प्रत्यक्षात ‘बलुचिस्तान रिपब्लिक’चे आहेत, पाकिस्तानचे नाहीत. मीर यार बलुचिस्तान म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाला पाकिस्तानी लष्कराने, विशेषतः लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी ‘पूर्णपणे दिशाभूल’ केली आहे. त्यांनी पाकिस्तानला दहशतवादाला आश्रय देणारा देश म्हटले आणि त्यांच्या लष्करी नेतृत्वाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.