Ukraine : रशियाच्या तेल डेपोवर युक्रेनचा ड्रोन हल्ला; स्फोटाचा व्हिडिओ बनवणाऱ्या दोन रशियन मुलींना अटक
रविवारी रशियातील सोची येथील तेल डेपोवर युक्रेनने ड्रोनने हल्ला केला. हल्ल्यानंतर डेपोमध्ये मोठी आग लागली. क्रास्नोडार प्रदेशाचे गव्हर्नर वेनियामिन कोंड्रात्येव म्हणाले की, ड्रोनचा ढिगारा तेलाच्या टाकीवर आदळल्यानंतर आग लागली आणि ती विझवण्यासाठी १२० हून अधिक अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले.