Election Commission : आयोगाने केले विरोधकांच्या शंकांचे निरसन, संभाव्य दुबार मतदारांसह कास्ट व्हॅलिडिटीवर काय म्हटले, वाचा सविस्तर
राज्याच्या प्रलंबित महापालिका निवडणुकांचा विषय आज मार्गी निघाला. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची घोषणा केली. त्यानुसार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी आयोगाने उमेदवारी अर्ज ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आयोगावर होणाऱ्या चौफेर टीकेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुबार मतदारांचा पायबंद करण्यासाठीही काही ठोस निर्णय घेतलेत.