Jagannath Rath Yatra :जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 3 जणांचा मृत्यू; गुंडिचा मंदिरासमोर दुर्घटना
ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान एक मोठा अपघात झाला. रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास गुंडीचा मंदिरासमोर भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाजवळ गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान ३ भाविकांचा मृत्यू झाला. ५० जण जखमी झाले आहेत, त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.