• Download App
    October Benefit | The Focus India

    October Benefit

    Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच ऑक्टोबरचा लाभ मिळणार; 410.30 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता

    राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती घटकातील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ऑक्टोबर २०२५ या महिन्याचा आर्थिक लाभ वितरित करण्यासाठी रु. ४१०.३० कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी शासनाने ३९६० कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केले आहेत. यातून ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठी सदर निधी वितरित करण्यात आला आहे. वितरित करण्यात आलेला हा निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी आणि विभागप्रमुखांनी काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा तसेच निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थींसाठीच होईल याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत.

    Read more