Actor Kota Srinivasa Rao : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेते कोटा श्रीनिवास यांचे निधन; 2 दिवसांपूर्वी साजरा केला 83वा वाढदिवस
सन ऑफ सत्यमूर्ती, टेम्पर, येवाडू यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे दक्षिणेतील लोकप्रिय खलनायक कोटा श्रीनिवास यांचे १३ जुलै रोजी निधन झाले. हे अभिनेते ८३ वर्षांचे होते. त्यांनी १० जुलै रोजी त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा केला. हे अभिनेते बऱ्याच काळापासून आजारी होते.