Chagan Bhujbal : ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरे वाटेकरी नको; लाखोंच्या लोंढ्यांसह मुंबईत येणार, छगन भुजबळांचा इशारा
आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही देखील लाखोंच्या लोंढ्यासह मुंबईत दाखल होणार आणि आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. तसेच ओबीसी प्रवर्गात अजून कोणत्याही जातीला आणू नका, असेही त्यांनी पत्रकार परिषदेतून म्हटले आहे.