Sharad Pawar : आरक्षण वादावर शरद पवारांची भूमिका- कोणतीही कमिटी एका जातीची नको समाजाची करा, सामाजिक ऐक्य हवे
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर जारी केला. मात्र, याला ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, असा दावा ओबीसी संघटनांकडून करण्यात येत आहे. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने एका जातीची समिती न करता, सर्वसमावेशक समिती तयार करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. “सरकार कोणत्याही एका जाती-धर्माचे नाही, ते सर्वांचे असायला हवे,” असेही शरद पवार म्हणालेत.