Chhagan Bhujbal, : ओबीसींचा कोर्टात अन् राजकारणातही विजय होईल; छगन भुजबळांनी व्यक्त केला ठाम विश्वास
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधत ओबीसींचा कोर्टात अन् राजकारणातही विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्य एक ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला.