आता ‘या’ राज्यात ओबीसी आरक्षण वाढणार!
कर्नाटकातील जात जनगणनेशी संबंधित एक महत्त्वाचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. या अहवालात राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी (ओबीसी) आरक्षणाची टक्केवारी सध्याच्या ३२ टक्केवरून ५१ टक्केपर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा अहवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखालील कर्नाटक मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला. सरकारी सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली.