• Download App
    OBC Protest | The Focus India

    OBC Protest

    OBC Protest : ओबीसींचे 17 फेब्रुवारीला नागपुरात भव्य आंदोलन; जातीनिहाय जनगणना आणि यूजीसीच्या नव्या धोरणांविरोधात आक्रमक

    नागपुरात सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित बैठकीत ओबीसींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर मंथन करण्यात आले असून, या बैठकीत 17 फेब्रुवारी रोजी नागपुरात भव्य आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.

    Read more

    Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न; वाहनाची काच फुटली, जालन्यात ओबीसी आंदोलनाला जाताना घडला प्रकार

    मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर वारंवार टीका करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर आज जालन्यात काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मराठा आंदोलकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

    Read more

    OBC Protest : हैदराबाद गॅझेटियर जीआर रद्द करा; ओबीसींचा हिंगोलीत मोर्चा; राज्य सरकारच्या विरोधात घोषणा

    राज्य शासनाने मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरबाबत काढलेला अध्यादेश रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी सकल ओबीसी समााजाच्या वतीने बुधवारी कळमनुरीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मराठवाड्यातून ओबोसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    Read more