OBC Mahasangh : ओबीसी महासंघाचा मराठा आरक्षणाला विरोध:नागपुरात साखळी उपोषण सुरू; मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास नकार
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. नोंदी मिळालेल्या ५४ लाख मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे. ते पाहता सरकार दबावात निर्णय घेण्याची भीती ओबीसी समाजात आहे. मात्र दबावात येऊन निर्णय घेतल्यास वा तसे दिसल्यास आम्हीही आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा रोखठोक इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. सरकारने कुणबी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही मुंबईत धडकू, असा सज्जड इशाराही तायवाडे यांनी यावेळी दिला.