Lakshman Hake : बीडमध्ये ओबीसी नेत्यांचा महाएल्गार! छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात सभा, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; चौथी नापास म्हणत जरांगेंना डिवचले
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज, 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये राज्याच्या समस्त ओबीसी समाजाची एक मोठी महाएल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. सभेच्या आधी छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांच्यात हॉटेल सनराईज येथे बैठक झाली.