Devendra Fadnavis : ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओबीसी समाजासाठी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता लक्षात घेऊन त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण विधान केले. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांची केवळ घोषणा झाली होती, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर 60 नवीन ओबीसी वसतिगृहे सुरू केली. तसेच, 10 लाख ओबीसींना हक्काची घरे दिली आणि समाजासाठी असलेली आर्थिक महामंडळेही मजबूत केली.