श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा नाशिकच्या रामतीर्थ निरंजन मठात २७ जूनला पट्टाभिषेक सोहळा!!
श्री सद्गुरू कृपेनें रामतीर्थ निरंजन मठाचे मठाधिपती म्हणून विराजमान होणारे श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा भव्य पट्टाभिषेक सोहळा(चादर विधी) शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी अभिजित मुहूर्तावर संपन्न होणार असल्याची माहिती स्वागत समितीने आज पत्रकार परिषदेत दिली. हा सोहळा महंत श्री भक्तीचरणदासजी महाराज, विरक्त साधू समाज नाशिक मंडळ, नाशिक यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध मठांचे साधू – महंत या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.