NPCI Bans : 1 ऑक्टोबरपासून UPI द्वारे पैशाची मागणी पाठवता येणार नाही; NPCIचा फसवणूक रोखण्यासाठी मोठा निर्णय
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने १ ऑक्टोबर २०२५ पासून UPI मधील पीअर-टू-पीअर (P2P) “कलेक्ट रिक्वेस्ट” सुविधा पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला UPI द्वारे पैसे मागण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही.