Russia Warns : रशियाचा अमेरिका, दक्षिण कोरियासह जपानला इशारा; म्हटले- उत्तर कोरियाविरुद्ध लष्करी युती करू नका!
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानला उत्तर कोरियाला लक्ष्य करून कोणताही सुरक्षा युती किंवा लष्करी युती करू नये असा इशारा दिला आहे.लावरोव्ह उत्तर कोरियाच्या वोनसान शहरात होते. यादरम्यान त्यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेतली.