Ajit Pawar : 15 ऑगस्ट रोजी अनेक जिल्ह्यांत मांसाहारावर बंदी; अजित पवार म्हणाले- स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अशी बंदी घालणे उचित नाही
स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नागपूर या महापालिकांनी सुद्धा हा आदेश दिला आहे. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.