Donald Trump : नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेट न केल्याने भारतावर लादला टॅरिफ; न्यूयॉर्क टाइम्सचा दावा, ट्रम्प म्हणाले- पाकिस्तानने केले, भारतानेही करावे
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, भारत आणि अमेरिकेतील तणावामागील खरे कारण ट्रम्प यांची नोबेल पुरस्काराची इच्छा आहे. अहवालात म्हटले आहे की, ट्रम्प यांनी १७ जून रोजी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली होती. यादरम्यान, ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणल्याबद्दल त्यांना किती अभिमान आहे असे म्हटले होते.