Nitish Kumar : ‘दिल्लीतील अहंकारी नेतृत्व आणि कुशासनाचा अंत झाला’ ; नितीश कुमारांनी भाजपचे केले अभिनंदन
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने मिळालेल्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन आणि शुभेच्छा. दिल्लीतील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप अभिनंदन.