Nitish Kumar : नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगदरम्यान मोठी दुर्घटना टळली
राजगीरमध्ये शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंग दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे दोन टिन शेड उडू लागल्याने गोंधळ उडाला. राजगीर स्पोर्ट्स अकादमीच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले असताना ही घटना घडली.