भाजपकडून नवा धक्का; 45 वर्षांचे नितीन नवीन सिन्हांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती!!
अनेकदा राजकीय धक्का देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व कालच्या भाजपने आज नवीन धक्का दिला. देशभरात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना भाजपच्या संसदीय मंडळाने 45 वर्षांच्या नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावर नियुक्ती केली. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक आणखी किती काळ पुढे ढकलली जाणार याविषयी देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.