Nitin Gadkari : रस्ते अपघातातील जखमींवर तातडीने मोफत उपचार; दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचारांचा लाभ
रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी देशभरातील रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली.