Nitesh Rane : हिरव्या सापांना जवळ केल्याने ठाकरे ब्रँड संपला, नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
ठाकरे हा ब्रँड बाळासाहेब ठाकरेंच्या नावामुळे होता. यांनी हिरव्या सापांना जवळ करत हा ब्रँड संपवला आणि आता बोलत आहे. यात आमची काय चुकी? त्यांची चुकी आहे. त्यांनी हिंदुत्व सोडले. उबाठामध्ये केवळ आदित्य ठाकरे,उद्धव ठाकरे राहणार आहेत, असा हल्लाबोल भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.