Maharashtra : बारावी परीक्षेसाठी राज्यात 15.32 लाख विद्यार्थी नोंदणी:3,387 केंद्रांवर 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेसाठी यंदा १५ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान राज्यातील ३ हजार ३८७ मुख्य केंद्रांवर घेतली जाईल. मंडळाचे प्रभारी अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.